राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. डॉ. श्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन सभा मोठ्या उत्साहात संपन्न
शिर्डी (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची “खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन सभा” राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. श्री राधाकृष्णजी_विखे_पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज राहाता येथे पंचायत समितीच्या पद्मभूषण मा. खा. बाळासाहेब विखे पाटील सभागृहात संपन्न झाली..!
यावेळी शिर्डी मतदार संघातील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी कृषीयंत्र ज्यात हॉर्वेस्टर, ड्रोन, ट्रॅक्टर, शेडनेटचे व स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेंच मा. ना. विखे पाटील साहेबांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्या जागेवर सोडवण्यात आल्या..!
यावेळी बोलतांना ना. श्री विखे पाटील म्हणाले की येणाऱ्या मान्सूनवर “एल निनो” मुळे गंभीर संकट उभे राहणार आहे. यासाठी शेतकरी, नागरिक तसेच कृषिविभाग, जलसंपदा विभागाने तयार राहायला पाहिजे. “एल निनो” बाबत बोलतांना साहेब म्हणाले की पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढून होणारा हा बदल आहे. ज्याचा फटका जागतिक हवामानाला बसतो. उष्णतेमुळे वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह आणि ढगांची निर्मिती बदलते, ज्यामुळे जागतिक स्तरावर हवामानात बदल होतात. भारतीय मान्सूनवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. एल निनोमुळे भारतात मान्सूनचा पाऊस कमी होऊन, शेतीवर आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. या दुष्परिणामाबाबत शेतकरी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी कृषिविभाग व जलसंपदा विभागाला नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केल्या..
यावेळी सदर बैठकीस शिर्डी नगरपरिषद शिर्डीच्या लोकनियुक्त_नगराध्यक्षा मा. सौ. जयश्रीताई विष्णु थोरात उपस्थित होत्या. तसेच उपनगराध्यक्ष श्री अभय भैय्या शेळके पा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर, राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. श्री स्वाधीन गाडेकर, उपजिल्हाधिकारी श्री कोळेकर प्रांतधिकारी श्री माणिकराव आहेर साहेब उपस्थित होते..!




