आज राहता तहसीलदार कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या वतीने वाढत्या महागाई व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन

राहता: (प्रतिनिधी)केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. यावेळी वाढत्या महागाईचा व गॅस दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे घरगुती अर्थकारण कोलमडले आहे. तसेच गॅस बुकिंग करताना ओटीपी न येणे, बुकिंग प्रक्रियेत अडचणी येणे तसेच गॅस वेळेत उपलब्ध न होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राहाता तहसीलदार मा. अमोल मोरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




