Breaking
ब्रेकिंग

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकास पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हा परिषद च्या मा. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा. यांच्या प्रमुख उपस्थिती त भव्य महिला संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

0 0 6 7 5 2

राहता (प्रतिनिधी)देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदेत सादर करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकास पाठिंबा दर्शविण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या संमेलनास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी या ऐतिहासिक विधेयकास आपला ठाम पाठिंबा दर्शविला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार सौ. स्मिता गुणे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत नारी शक्ती वंदन अधिनियमाचे सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक महत्त्व सविस्तरपणे विषद केले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समान प्रतिनिधित्वासाठी आणि निर्णयप्रक्रियेत त्यांच्या सक्रिय सहभागासाठी हे विधेयक किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या संमेलनाच्या माध्यमातून महिलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाजात समता, सशक्तीकरण आणि सहभाग या मूल्यांना बळकटी मिळाली असून नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनातून महिला सक्षमीकरणाचा मार्ग अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 7 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे