श्री साईबाबा संस्थान कडून दुष्काळ निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस५ कोटी रुपयाचे योगदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्त

*शिर्डी, (प्रतिनिधी) दि. २७ ऑक्टोबर २०२६ :* महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ निवारण कार्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. या रकमेचा धनादेश आज श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी मराठवाडा व महाराष्ट्र कृष्णा खोरे) तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री(विदर्भ, तापी व कोकण) श्री. गिरीश महाजन उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने संस्थानच्या वतीने हे आर्थिक योगदान देण्यात आले आहे.
श्री साईबाबा संस्थान भाविकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सेवाभावी कार्यातही योगदान देत असते. दुष्काळ निवारण कार्यासाठी दिलेले हे योगदान संस्थानच्या सेवाभावी कार्यपरंपरेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.




