Breaking
ब्रेकिंग

राहता तहसीलदार यांना ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने निवेदन

0 1 4 8 7 2

शिर्डी (प्रतिनिधी):राष्ट्रीय अध्यक्ष: मा. श्री. दादाभाऊ केदारे, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष: मा. श्री. भगवान थोरात, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुका तहसीलदार मा. श्री. हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने आपले लक्ष केंद्रित करावे हा हेतू व उद्देश देशात व राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत आपण विचार केला असता प्रचंड प्रमाणात महागाई होत आहे. शेतकरी बांधवासह सामान्य माणसाची फसवणूक होत आहे बाजारपेठेत कडधान्य, खाद्यतेल, तांदूळ, धान्य, गॅस सिलेंडर, भाजीपाला, बियाणे खते, कीटकनाशके याच्या किमती वाढल्या आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिक मजूर शेतकरी बांधव यांची कंबरडे मोडले आहे तसेच व्यापारी वर्गाचा साठेबाजी व काळाबाजार या कृत्याने जीवनावश्यक वस्तूच्या टंचाई निर्माण झाली आहे . हे एक दरवाढीचे कारण निर्माण झाल्याचे दिसून येते. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे व दररोज जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक हिताचे रक्षण व रास्त दारात वस्तू
मिळवून देणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. तसेच रेशन दुकानद्वारे शिधापत्रिका धारकांना चांगल्या दर्जाचे तांदूळ गहू तसेच सर्व प्रकारचे डाळी खाद्यतेल आणि साखर अत्यंत सवलतीच्या दरात पुरवण्यात यावी तसेच रेशन दुकान उघडण्याच्या वेळेचे फलक लावण्यात यावे.

सर्वसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती जर यावर लवकरात लवकर योग्य पावले उचलले गेले नाहीत तर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
राहता तालुका तहसीलदार कार्यालयात मा.श्री. हेमंत पाटील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अँड -श्री रामनाथ सदाफळ पत्रकार श्री. रवींद्र जगताप पत्रकार श्री मुस्ताक अली भाई शहा श्री दिनकर साळवे असे विविध प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे