ब्रेकिंग
श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ३ लाख ०१ हजार ५०० रुपये किमतीचे ९० क्विंटल(९०००किलो) गहू अर्पण केले

0
1
4
8
7
2
शिर्डी (प्रतिनिधी):
देश-विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध स्वरूपात दान अर्पण करीत असतात. याच श्रद्धेपोटी इंदौर येथिल साईभक्त श्री पंकज जैन व श्रीमती आरती जैन यांनी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ३ लाख ०१ हजार ५०० रुपये किंमतीचे ९० क्विंटल (९००० किलो) गहु अर्पण केले. या गव्हाचा उपयोग संस्थानच्या श्री साईप्रसादालयात भाविकांना प्रसादरूपाने देण्यात येणाऱ्या भोजनासाठी करण्यात येणार आहे.
या देणगीनंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
0
1
4
8
7
2




