ब्रेकिंग
श्री साईबाबांच्या चरणी प्रगतशील शेतकऱ्यांकडून ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा प्रसाद स्वरूपात अर्पण

0
1
4
8
7
2
शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशीतील लाखो साई भक्त श्रद्धेने मोठ्या प्रमाणात शिर्डी येथे येत असतात. अनेक साई भक्त वेग वेगवेगळ्या प्रकारचे दान श्री साई चरणी अर्पण करत असतात त्यातच आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायण वाडी (नारायण बाग) येथील प्रगतशील शेतकरी श्री रवी नारायण कराळे यांनी साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा प्रसाद स्वरूपात अर्पण केला आहे .गेल्या अनेक वर्षापासून ते पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेत असून, रासायनिक खतांचा वापर न करता तयार करण्यात आलेल्या या आंब्याच्या रस उद्यापासून श्री साईबाबा प्रसादालयातील प्रसाद भोजनामध्ये भाविकांना देण्यात येणार आहे.
0
1
4
8
7
2




