Breaking
ब्रेकिंग

सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रणरागिनी लोकनियुक्त शिर्डी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा मा. सौ जयश्रीताई थोरात यांचा दामिनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

0 0 6 5 1 0

नाशिक (प्रतिनिधी) दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ तसेच संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य व दिव्य असा जागतिक राष्ट्रीय महिला दिनानिमित्त सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा दामिनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्या पुरस्कार समारंभासाठी अनेक राज्यातून तसेच जिल्ह्यातून अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांचे हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त हा दामिनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लोकनियुक्त शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रणरागिनी मा. सौ जयश्रीताई थोरात यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात तसेच जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते नाशिक येथे दामिनी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . या दामिनी राष्ट्रीय पुरस्कारामुळे शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांचा अनेक स्तरातून कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे